Skip to main content

locanto.net या अश्लील संकेतस्थळावर टाकणाऱ्या अलपेश वल्लभदास पारेख या 47 वर्षीय आरोपीला मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केली आहे


गृहनिर्माण सोसायटीच्या मीटिंग मध्ये झालेल्या वादाचा राग मनात धरून एका महिलेचा संपर्क क्रमांक व फोटो locanto.net या अश्लील संकेतस्थळावर टाकणाऱ्या अलपेश वल्लभदास पारेख या 47 वर्षीय आरोपीला मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केली आहे. 
मालाड परिसरात राहणाऱ्या व एका बँकेत काम
करणाऱ्या 37 वर्षीय महिलेला गेल्या काही दिवसांपासून तिच्या मोबाईलवर वेगवेगळ्या क्रमांकावरून शरीर संबंध ठेवण्यासाठी सतत रात्री अपरात्री कॉल येत होते. सुरवातीला पीडित महिलेने या गोष्टीकडे दुर्लक्ष केले होते मात्र सतत येणारे फोन कॉल , वाटस आप वर लैंगिक सुख व रिलेशनशिप ठेण्यासाठी येणाऱ्या मेसेज मुळे त्रासलेल्या पीडित महिलेने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.
काही दिवसांनी सदरच्या या महिलेला पुन्हा एका पुरुषाने  कॉल करून विचारणा केली असता पीडित महिलेने माझा मोबाईल क्रमांक कुठून मिळाला म्हणून विचारले . कॉल करणाऱ्या व्यक्तीने या महिलेला locanto.net या संकेतस्थळावरील लिंक पाठवली असता , या संकेतस्थळावर या महिला सोबत तिच्या इमारतीत राहणाऱ्या आणखीन एका महिलेचा फोटो असल्याचे आढळून आले. याची माहिती बांगुर नगर पोलीस ठाण्यात दिली असता गुन्हे शाखेकडून यात तपास सुरू करण्यात आला होता.
सोसायटीच्या मीटिंग मध्ये झालेल्या वादातून सूड उगविण्याचा प्रयत्न-
पीडित महिला व तिचा पती राहत असलेल्या इमारतीच्या कार्यकारिणी समितीचे सभासद आहेत. 15 एप्रिल रोजी सोसायटी कमिटीच्या पार पडलेल्या बैठकीत पीडित महिलेचे त्याच इमारतीत राहणाऱ्या अलपेश पारेख (47) या कस्टम ट्रान्सपोर्ट क्लियरिंग च काम करणाऱ्या व्यक्तीशी भांडण झाले होते. हा राग मनात धरून अलपेश याने अश्लील संकेतस्थळावर या महिलेचा वाटस आप फोटो व मोबाईल क्रमांक पोस्ट केल्याचे पोलीस तापासत उघड झाले असून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

Populars Posts

MHADA Introduces Mhaadasathi AI Chatbot For Instant Citizen Services

MHADA Introduces Mhaadasathi AI Chatbot For Instant Citizen Services   Mumbai Gets Digital Boost With MHADA's 'Mhaadasathi' AI Chatbot Launch   मुंबई से बड़ी खबर सामने आई है जहां महाराष्ट्र हाउसिंग एंड एरिया डेवलपमेंट अथॉरिटी यानी म्हाडा ने गुरुवार को ‘म्हाडासाथी’ नामक एआई चैटबॉट सेवा शुरू की है। यह सेवा नागरिकों को तुरंत और सही जानकारी उपलब्ध कराने के लिए तैयार की गई है।   पहले चरण में ‘म्हाडासाथी’ चैटबॉट को म्हाडा की आधिकारिक वेबसाइट पर उपलब्ध कराया गया है। इसके माध्यम से अब नागरिक विभिन्न विषयों पर भरोसेमंद और सटीक जानकारी घर बैठे प्राप्त कर सकेंगे।   म्हाडा के मुख्य कार्यकारी अधिकारी और उपाध्यक्ष संजीव जायसवाल के अनुसार इस सेवा को दूसरे चरण में मोबाइल प्लेटफॉर्म पर भी उपलब्ध कराया जाएगा।   यह पहल नागरिकों की दिक्कतों को कम करने में मदद करेगी। अब उन्हें बार बार कार्यालय जाने की जरूरत नहीं होगी, लंबी कतारों से बचाव होगा और समय की बचत के साथ सही जानकारी तुरंत मिल पाएगी।   म्हाडासाथी चैटबॉट मराठी और अंग्रेजी दोनों भ...