गृहनिर्माण सोसायटीच्या मीटिंग मध्ये झालेल्या वादाचा राग मनात धरून एका महिलेचा संपर्क क्रमांक व फोटो locanto.net या अश्लील संकेतस्थळावर टाकणाऱ्या अलपेश वल्लभदास पारेख या 47 वर्षीय आरोपीला मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केली आहे. मालाड परिसरात राहणाऱ्या व एका बँकेत काम करणाऱ्या 37 वर्षीय महिलेला गेल्या काही दिवसांपासून तिच्या मोबाईलवर वेगवेगळ्या क्रमांकावरून शरीर संबंध ठेवण्यासाठी सतत रात्री अपरात्री कॉल येत होते. सुरवातीला पीडित महिलेने या गोष्टीकडे दुर्लक्ष केले होते मात्र सतत येणारे फोन कॉल , वाटस आप वर लैंगिक सुख व रिलेशनशिप ठेण्यासाठी येणाऱ्या मेसेज मुळे त्रासलेल्या पीडित महिलेने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. काही दिवसांनी सदरच्या या महिलेला पुन्हा एका पुरुषाने कॉल करून विचारणा केली असता पीडित महिलेने माझा मोबाईल क्रमांक कुठून मिळाला म्हणून विचारले . कॉल करणाऱ्या व्यक्तीने या महिलेला locanto.net या संकेतस्थळावरील लिंक पाठवली असता , या संकेतस्थळावर या महिला सोबत तिच्या इमारतीत राहणाऱ्या आणखीन एका महिलेचा फोटो असल्याचे आढळून आले. याची माहिती बांगुर नग...